
1. भारतीय सामाजिक सशक्तिकरण शोध पत्रिका (Indian Social Empowerment Research Journal)
Social Empowerment Multipurpose Organization Wardha, Maharashtra
हमारा उद्देश्य समाज का समग्र विकास और
सशक्तिकरण पर
केंद्रित हैं। सामाजिक सशक्तिकरण बहुउद्देशीय संस्था का लक्ष्य/उद्देश्य है कि समाज के हर वर्ग को न्याय, सम्मान
और समानता का अवसर मिले ताकि वे अपने जीवन को बेहतर बना सकें और एक समृद्ध और सशक्त समाज का निर्माण कर सकें
१) महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासनाचे
मंजुरीने चालविण्यांत
येणाऱ्या शिक्षण
प्रणालीचे प्रचारार्थ
आणि जनतेचे उन्नतीकरीता मुलांकरीता बालसदन, बालकमंदिर, अंगणवाडी, बालवाडी. कॉन्व्हेंट,
प्राथमिक/ माध्यमिक शाळा, कलावाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, वैद्यकिय महाविद्यालय, दंत
महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, डी.फार्म, एम.फार्म महाविद्यालय, मॉन्टेसरी कोर्स,
डि.एड., बी. एड. महाविद्यालय, बी. एस. डब्लु, एम.एस.डब्लु, कृषी महाविद्यालय, डेअरी
डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र, हॉटेल मॅनेजमेंट कोर्स स्थापन करणे.
२) तसेच महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या
अंतर्गत येणाऱ्या तांत्रिक
प्रशिक्षण
संस्था, संगणक प्रशिक्षण केन्द्र, ब्युटी
पार्लर कोर्स, क्राफ्ट टिचर प्रशिक्षण केंद्र, ड्रेस डिझायनिंग, शिवनकला, हस्तकला, भरतकला प्रशिक्षण केंद्र,
छाया
चित्रांकण प्रशिक्षण संस्था स्थापन करणे, स्वास्थ्य संबंधित कार्यक्रम, योजना, प्रोजेक्ट चालविने, सिव्हील
वर्क करणे.
३) तांत्रिक प्रशिक्षण संस्था, औद्योगिक
प्रशिक्षण संस्था,
अभियात्रिक, तंत्र
निकेतन, दुग्ध व पशुसंवर्धन पदविका विद्यालय, टायपिंग विद्यालय, चित्रकला विद्यालय, कॉम्प्युटर (संगणक)
प्रशिक्षण विद्यालय, सौंदर्यशास्त्र पदविका अभ्यासक्रमाचे वर्ग स्थापन करणे
४) महिलां करीता बालविकास प्रशिक्षण
केन्द्र चालविणे, निराधार
महिलांना व
मुलींकरीता वसतीगृह चालविणे.
महिलांकरीता गृहउद्योगाचे, लघुउद्योगांचे, कुटीर उद्योगाचे प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे.
५) ग्रामिण व शहरी भागातील लोकांकरीता
समाजकल्याण विभाग, जिल्हा
परिषद, जिल्हा
क्रिडा अधिकारी
कार्यालय, राज्य शासन व केन्द्र शासन तर्फे राबविण्यांत येणाऱ्या विविध शैक्षणीक व क्रिडा विषयक योजना
राबविणे.
६) गरिब होतकरून विद्यार्थ्यांना विविध
खेळांचे प्रशिक्षण देवुन
त्यांना
प्रोत्साहन देणे, त्यांना शिष्यवृत्ती देणे.
(७) गरजु विद्यार्थ्यासाठी आर्थिक मदत,
शिष्यवृत्या, बक्षिसे,
प्रमाणपत्रे,
वह्या पुस्तके द्वारा मदत करणे व त्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक ते कार्य करणे. अनाथालय, वृध्दाश्रम, आश्रमशाळा,
प्रौढ शिक्षण शाळा व मुला-मुलींचे वसतीगृहे स्थापन करणे.
८) राष्ट्रीय कार्यास हातभार लावण्याचे
दृष्टीने प्रवचन, वादविवाद,
कवि सम्मेलन,
पर्चासत्र, परिसंवाद, व्याख्यानमाला, निबंध प्रतियोगिता, शोध पत्र-शोध आलेख प्रकाशन, सामाजिक हित संबंधित
जागरूकता कार्यक्रम, व्यसनमुक्ती शिविर, अधंश्रद्धा निर्मूलन, साक्षरता अभियान, नेत्रदान शिविर ह्यासारख्या
उपक्रमाचे आयोजन करणे, पुस्तकालय सुरू करने.
९) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,
विमुक्त जाती, भटक्या जमाती
यांच्या शैक्षणीक
उती करीता आश्रमशाळा स्थापन करणे.
(१०) अंध, मुक-बधिर, मतिमंद, विकलांग
यांच्यासाठी अपंग अराधालय,
अपंग निवासी
शाळा, वसतीगृह स्थापन निरणे, बाल मार्गदर्शन केन्द्र, चिकित्सा केन्द्र, बालसंगोपन योजना, दत्तक योजना केन्द्र
पुरस्कृत योज शिशुगृह, राष्ट्रीय बालपोश योजना राबविणे.
११) सांस्कृतीक कला केंद्र स्थापन करून
विविध कलांचे शिक्षण व
प्रशिक्षण देणे.
गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्याना पारितोषीक (बक्षिसे) व पुरस्कार देणे.
१२) आदर्श गांव प्रकल्प, ग्राम आरोग्य
प्रकल्प, पाणी स्वच्छता, सुलभ
शौचालय
प्रकल्प, जिवन शाळा प्रकल्प, पंचायत राज प्रबोधन शिबीर राबविने.
१३) कला व सांस्कृतीक क्षेत्रात भरीव
कामगिरी करण्याच्या दृष्टीने
संस्थेद्वारा
या क्षेत्रातील कलाकारांना व्यासपीठ मिळावे या करिता आवश्यक उपक्रम राबविणे, त्यासाठी राज्यस्तरावर व जिल्हा
स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करून त्याच्या प्रतिभेला वाव देण्यां साठी तज्ञ मार्गदर्शकाचे तथा मान्यवरांचे
मार्गदर्शन घेणे याच्या साठी चर्चासत्रे, परिसंवाद, मेळावे यांचे आयोजन करणे.
१४) सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये
वेगवेगळ्या विषयांवर भाषण,
वादविवाद, स्पर्धा
(चित्रकला, सामान्य ज्ञान वगैरे), साहित्य वाचन, नाटक, स्नेह संम्मेलन हे कार्यक्रम आयोजित करणे, व्यसनमुक्ती
कार्यक्रम चालविणे, व्याख्याने, चर्चासत्र, परिसंवाद, कलापथके व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे लोक शिक्षणाचे
कार्यक्रम करणे, तसेच गावोगावी जाऊन मेळावे घेणे, शिबिरे आयोजित करणे व त्यामधे महिलांना मार्गदर्शन करणे व
त्यांना समाजात उन्नती करिता प्रोत्साहीत करणे तसेच तांत्रिक प्रशिक्षण केन्द्र उघडुन ते चालविणे.
१५) लोकांना कला व क्रिडाबद्दल
प्रोत्साहित करून त्यांना कला व
क्रिडाचे महत्व
पटवुन देणे, भारतीय खेल प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या खेळाचे प्रशिक्षण देणे.
१६) कला व क्रिडा स्पर्धेचे आयोजन करणे,
उत्कृष्ट खेळाडू प्रशिक्षित
करुन
त्यांना जिल्हास्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेण्याची संधी उपलब्ध करून देणे.
१७) गरिब होतकरून विद्यार्थ्यांना कला व
क्रिडाचे प्रशिक्षण देवुन
त्यांना
प्रोत्साहन देणे, त्यांना शिष्यवृत्ती देणे.
१८) कला व क्रिडा विषयक धोरण राबविणे,
खेळाडुना तालुका, जिल्हा,
विदर्भ, राज्य,
राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड व्हावी म्हणुन विशेष प्रयत्न करने त्यासाठी ठिकाणी शिबिरे, प्रशिक्षण,
मार्गदर्शन देणाऱ्या शाखा-उपशाखा तथा मार्गदर्शनात्मक केन्द्र स्थापन करून देश तथा समाजाच्या विकासासाठी विशेष
प्रयत्न करने.
१९) खेळाडूंच्या हितार्थ विविध
कार्यक्रम घेणे महिला व मुलांकरीता व अपंगा करीता व
आदीवासी मुला-मुलींन करीता कला व क्रिडेचे प्रशिक्षण व स्पर्धा आयोजित करणे.
२०) शारीरिक, मानसिक तसेच आरोग्य विकासा
करीता व्यायाम शाळा स्थापन
करणे.
लोकांना व्यायामाचे महत्व पटवुन देणे, विविध व्यायाम प्रकाराचे प्रशिक्षण देणे. व्यायामासाठी लोकांना आधुनिक
यंत्रसामुग्री उपलब्ध करून
देणे, शारीरिक प्रशिक्षण संस्था, योग साधना केन्द्र स्थापना करणे.
२१) जिल्हा क्रिडा अधिकारी
कार्यालयांतर्गत युवक कल्याणार्थं
राबविण्यात
येणाऱ्या सर्व योजनांची माहिती देणे. युवक-युवती कल्याणार्थ क्रिडा विषयक शासकिय योजनाची माहिती देणे युवक-युवती
व्यक्तीमत्व विकास शिबीर, नेतृत्व विकास शिविर, चर्चासत्र, परिसंवाद, पथनाटय आयोजित करणे.
२२) कला व सांस्कृतीक क्षेत्रात भरीव
कामगिरी करण्याच्या दृष्टीने
संस्थेद्वारा
या क्षेत्रातील कलाकारांना व्यासपीठ मिळावे या करिता आवश्यक उपक्रम राबविणे, त्यासाठी राज्यस्तरावर व जिल्हा
स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करुन त्याच्या प्रतिभेला वाव देण्या साठी तज्ञ मार्गदर्शकाचे मान्यवरांचे मार्गदर्शन
घेणे यांच्या साठी चर्चासत्रे, परिसंवाद, मेळावे यांचे आयोजन करणे.
२३). सामाजिक सशक्तिकरण बहुउदेशिय
संस्था वर्धा , वर्धा ता. जि.
वर्धा या
संस्थेच्या नियम व नियमावली प्रमाणे ज्या कार्यकारी मंडळावर सदद्दू संस्थेची व्यवस्था व कारभार सोपविण्यात आलेला
आहे, अशा पहिल्या कार्यकारी मंडळाच्या सभासदाचे संपुर्ण नाव, पत्ता, हुद्दा, वय, व्यवसाय व राष्ट्रीयत्व खालील
प्रमाणे आहे.
उद्देश्य
“सामाजिक सशक्तिकरण बहुउदेशिय
संस्था
ता. जि. वर्धा”
संस्थेचे उद्देश :- संस्थेचे उद्देश और कार्य क्षेत्र खालील
प्रमाणे आहेत.